काश्मीर: लष्कराची मोठी कारवाई; चकमकीत ९ दहशतवादी ठार

0

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आज रविवारी पाकिस्तानी दहशवाद्यांच्या घुसखोरीला लगाम घालत भारतीय लष्करी जवानांनी ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुपवाड्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजिक ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर २ जवान जखमी झाले आहेत.
दहशतवाद्यांविरोधातील या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे लष्कराने केलेल्या कारवाईत ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर २४ तासांमध्ये एकूण ९ दहशतवादी ठार झाले आहेत. यांपैकी ४ दहशतवादी काल कुलगाम येथे मारले गेले होते.