किनगावच्या युवकाचा पुण्यात चक्कर येवून पडल्याने मृत्यू

0 2

यावल- कामधंद्याच्या शोधात गाव सोडून पुणे येथे काम करणार्‍या एका 33 वर्षीय तरुणाचा रविवारी पुणे शहरातच चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. शेख शरीफ शेख रऊफ (33, रा. किनगाव खुर्द ता. यावल) असे युवकाचे नाव आहे.किनगाव खुर्द येथील रहिवाशी शेख शरीफ शेख रऊफ हा गावाकडे काम नसल्याने काही महिन्यांपासुन पुणे शहरातील कोंढवा परीसरात मजुरी करून उदरनिर्वाह करत होता. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तो त्या भागातून जात असताना अचानक त्याला चक्कर येऊन तो जमिनीवर कोसळला. त्यात तो जागीच गतप्राण झाला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीरवार आहे. पुणे येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह किनगाव येथे आणल्यानंतर सोमवारी दुपारी त्याच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये गावातील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.