किनगाव मारहाण प्रकरण ; आरोपी कोठडीत

0 1

यावल- तालुक्यातील किनगाव येथे आरोपी निलेश बारकू महाजन, सुभाष श्रावण पाटील, सागर लहू पाटील व राकेश श्रावण पाटील या चौघांनी भांडण सोडवण्याकरीता आलेल्या विजय साळुंके व राहुल बापू साळुंके यांना लोंखडी फायटरने मारहाण केली होती. या प्रकरणी विजय मधुकर साळुंके (रा.किनगाव) यांच्या फिर्यादीनुसार चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील निलेश बारकू महाजन, सुभाष श्रावण पाटील व राकेश श्रावण पाटील यांना अटक केल्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्या.डी.जी.जगताप यांनी तिघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर त्यांचा जामीन नाकारण्यात आला. पुढील तपास हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणेे करीत आहेत.