कुर्‍हा पानाचे येथे दारू अड्ड्यावर कारवाई

0

भुसावळ- तालुक्यातील कुर्‍हा पानाचे शिवारात बखड जागेवर सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर तालुका पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कारवाई करीत गूळ, नवसागर, महू मिश्रीत कच्चे रसायनाचे भरलेले 10 ड्रममधील दोन हजार लिटर रसायनासह तयार गावठी हातभट्टीची 70 लिटर दारू मिळून 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. आरोपी हिरु बुधू गवळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक गजानन करेवाड, विठ्ठल फूसे, रीयाज शेख, सुनील चौधरी यांच्या पथकाने केली.