कुसूंब्याला गावठी दारु अड्डयावर एमआयडीसी पोलिसांचा छापा

0

जळगाव– तालुक्यातील कुसूंबा येथे चोरीने विक्री सुरु असलेल्या गावठी दारुच्या अड्डयावर मंगळवारी दुपारी 11.30 एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 3 हजार 600 रुपयांची गावठी दारु जप्त केली असून विनबाई विजयसिंग कंजर वय 65 रा. सुरेशजैन नगर, कूसूंबा या वृध्द महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुसूंबा येथे विनाबाई नावाची वृध्द महिला गावठी दारु विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे, शांताराम पाटील, दिनकर खैरनार, संतोष सोनवणे, मुकेश पाटील यांना रवाना केले. पथकाने माहितीनुसरा कुसूंबा गावात घराच्या आडोशाला गावठी विक्री करत असलेल्या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे एका कॅनमध्ये असलेली 3 हजार 600 रुपये किमतीची गावठी दारु जप्त केली आहे. तिच्या विरोधात शांताराम पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.