केंद्राच्या उपाययोजनेचे राहुल गांधींकडून कौतुक

0

नवी दिल्ली – देशातील 21 दिवसीय लॉकडाउन दरम्यान गरिबांचे हाल होऊ नयेत म्हणून केंद्रातील मोदी सरकारने आज 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. त्याचे काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी कौतुक केले आहे. योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत गांधी यांनी ट्विट केले आहे.