केजरीवालांचा शपथविधी सोहळा ठरला; रामलीला मैदानावर घेणार शपथ !

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने घवघवीत विजय मिळवून तिसऱ्यांदा सत्ता कायम राखली आहे. ७० पैकी ६२ जागा जिंकून आपने भाजप आणि कॉंग्रेसचा सुपडा साफ केला आहे. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम ठरला असून रविवारी १६ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ते शपथ घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी काल दिल्लीकरांचे आभार मनात सेवेची हमी दिली. दिल्लीतील जनतेने दिलेल्या अभूतपूर्व निकालाने केजरीवाल भारावून गेले. दुसरीकडे भाजपसाठी हा मोठा पराभव आहे. देशातील सर्वात मोठ्या पक्षाला दिल्लीत दोन आकडी संख्याही पार करता आली नाही.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ५५ जागा मिळतील असे भाकीत केले होते. मात्र, भाजपला गेल्या वेळेपेक्षा फक्त पाच जागा जास्त मिळाल्या आहेत. दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला असून, पक्षाला पाच टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला निवडणुकीत खाते उघडण्यात अपयश आले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ६३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. पक्षाच्या फक्त तीनच उमेदवारांना अनामत रक्कम वाचवता आली