केरळमधील ३ वर्षाच्या बालकाला कोरोनाची लागण

0

नवी दिल्ली : भारत देशात आतापर्यंत कोरोना विषाणू लागण झालेल्यांची संख्या ४० वर पोचली असून, काश्मीरमध्ये ४०० संशयित रुग्ण म्हणून निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केरळमधील एका ३ वर्षाच्या बालकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. केरळमध्ये होळीमुळे कोरोना व्हायरस पसरण्याची भीती लक्षात घेऊन पथमानथिट्टा जिल्हाधिकाऱ्यांनी ३ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

केरळमध्ये पाच नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. या ३ वर्षाच्या बालकाचे कुटुंबीय नुकतेच इटलीहून परतले होते. या बालकाला एर्नाकुलम मेडिकल कॉलेजच्या विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये आतापर्यंत ९ जण संक्रमित आहेत. काश्मीरमधील संशयित रुग्णाची संख्या पाहता या भागातील अंगणवाड्याही ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.