केळी संशोधन केंद्र, सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी द्या; मंत्री गुलाबराव पाटीलांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

0

जळगाव: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. जैन हिल्स येथे पद्मश्री आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी साकडे घेतले. जळगाव जिल्ह्यात विविध प्रकल्प सुरु करण्यासाठी आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक कामांना मंजुरी देण्याची विनंती केली. यात तेलबिया संशोधन केंद्राच्या १०० एकर जागेवर केळी संशोधन केंद्र मंजूर करावे

, मराठवाडा, विदर्भाप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही पेड पेण्डिंग वीज जोडणी मिळावी, खान्देशात सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवावा

, केळी संशोधन केंद्र मिळावे यासह विविध प्रकल्प सुरु करण्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.