ADVERTISEMENT
जळगाव – शिव कॉलनीमधील केशव मित्र मंडळातर्फे नुकतेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 32 जणांनी रक्तदान केले. या उपक्रमासाठी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे सहकार्य लाभले.
शिबीरप्रसंगी प्रा. नितीन बारी, आनंद साळी, अनिल पाटील, राजू देवगावकर, नितीन पिले, संजय जाधव, मनीष सातपुते, शैलेश बारी, प्रशांत महाजन, मनोज सावंत, यश सोनार, श्रीकृष्ण बारी, अमित महाबळ, सुनीत बारी, अथर्व साळी, रवि सोनवणे आदी उपस्थित होते. भाजपाचे पदाधिकारी दीपक सूर्यवंशी यांच्याहस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.