कॉंग्रेसचा एक गट शिवसेनेला पाठींबा देण्याच्या तयारीत !

0

मुंबई: राज्यातील राजकाणात वेगवान घडामोडी घडत आहे. शिवसेना-भाजपमधील अंतर्गत कलहामुले सत्ता स्थापनेबाबतचा तिढा सुटलेला नाही. एकीकडे भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेस मात्र यासाठी तयार नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान कॉंग्रेसमधील एक गट शिवसेनेला पाठींबा देण्यास तयार आहे. कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेत चर्चा केली होती.

आजच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. आज शरद पवार पत्रकार परिषद घेणार असल्याने या भेटीला महत्त्व आले आहे.