कॉंग्रेसच्या पत्राची आम्ही वाट पाहत होतो: अजित पवार

0

मुंबई: राज्यात सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम असून, काल संध्याकाळी शिवसेनेचे प्रतिनिधींनीमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटायला गेली होती. शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ मागितला होता. राज्यपालांनी शिवसेनेला वेळ दिला नाही. दरम्यान शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांची महा शिव गठबंधन होत असून , सत्तास्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहे. काल कॉंग्रेसने आपल्या पाठिंब्याचे पत्र न दिल्याने शिवसेनेला राज्यपालांनी वेळ दिला नाही. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार असून, संध्याकाळ पर्यंत वेळ दिला आहे. काल जर कॉंग्रेसने पाठिंब्याचे पत्र दिले असते तर सत्तास्थापन करता आली असती, आम्ही कॉंग्रेसच्या पत्राची वाट पहात होतो, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले आहे.
आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत असून, या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेस, राष्ट्रवादीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दिल्ली मध्ये सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली असू, यात काय निर्णय घ्यावा या विषयी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.