कॉंग्रेससोबत समान कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रवादीची पाच सदस्यीय समिती !

0

मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याची शक्यता आहे. तिन्ही पक्षात बोलणी सुरु आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत आता अनुकुलता दिसून येत आहे. परंतु तिघांनी एकत्र येण्यापूर्वी किमान, समान मुद्द्यावर चर्चा होऊन पुढील निर्णय होणार आहे. कॉंग्रेससोबत किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रवादीने पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. यात राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नबाव मलिक या पाच सदस्यीय समिती नियुक्ती करण्यात आली आहे. हे समिती किमान, समान कार्यक्रमावर कॉंग्रेसशी चर्चा करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेसाठी महाशिवआघाडी करण्याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप ठोस असेही काही झालेले नाही. सत्ता स्थापन न झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.