कॉंग्रेस नेते सोनिया गांधींच्या निवासस्थानी ; शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत चर्चा?

0

नवी दिल्ली: राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप-सेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते १० जनपथवर सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. सोनिया गांधींसोबत होणाऱ्या या बैठकीत महाराष्ट्रासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेसोबत जाण्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. यासह विधिमंडळ पक्षनेता निवडीबाबत देखील चर्चा होणार आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे हे काँग्रेस नेते सोनिया गांधीच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

आजच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. सहाजिकच त्यासाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागेल. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला साथ देणार का? हा महत्वाचा मुद्दा आहे.