कॉल करा आणि मिळवा रेमडेसिव्हीरची अचूक माहिती

जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी दिली माहिती

जळगाव – कोरोनाच्या उपचारामध्ये परिणामकारक ठरणार्‍या रेमडेसिव्हीरची इंजेक्शनची सर्वांना उपलब्धता व्हावी म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी खास नियंत्रण कक्ष बनवले आहे. ज्यामध्ये कॉल करून आपल्याला इंजेक्शनच्या उपलब्धतेची अचूक माहिती मिळू शकते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवारी एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून रेमडेसिव्हीरची इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. यात सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी हे मदत करणार आहेत. यासोबत अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांच्या कार्यालयात औषध निरिक्षक अनिल माणिकराव यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

ना. गुलाबराव पाटील यांचा अ‍ॅक्शन प्लॅन

जळगाव जिल्ह्यात सध्या रेमडेसिव्हीरची इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात स्थिती चांगली असून शासकीय रूग्णालयांमध्ये याचा पुरेसा साठा आहे. मात्र खासगी रूग्णालयांमध्ये याचा तुटवडा भासत असल्याच्या तक्रारी येतच असतात. कित्येक तसेच काही ठिकाणी याचा काळाबाजार होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवश्यक असेल त्या वेळेस रेमडेसिव्हीरची इंजेक्शन मिळावे यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आधीच याबाबत अ‍ॅक्शन प्लॅन आखला असून आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या नंबर वर करावा कॉल

०२५७-२२१७४७६ असा असून येथे कुणीही चोवीस तास कॉल करून रेमडेसिवीरच्या इंजेक्शनाच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळवू शकतात. तसेच [email protected] या ईमेल आयडीवरही ही माहिती मिळणार आहे.

सकाळी ७ ते दुपारी तीन
रामा एम. भरकड, अन्न सुरक्षा अन्न प्रशासन- ८१४९३४७२७३; प्रविण भगाजी थोंडकर, वरिष्ठ लिपीक-९०११९९७८४७; सी.डी.पालीवाल-८३२९५८४९२२ आणि मकरंद झाल्टे, लिपीक-८३२९५८४९२२ यांना कॉल करू शकता.

दुपारी तीन ते रात्री अकरा
किशोर आत्माराम साळुंखे-७९७७७२७७८० व ८१४९२७१७२७; मिलींद एकनाथ साळी-९३२६२१८५८/८२७५४९५४३३ यांच्याशी आपल्याला संपर्क साधता येईल.

रात्री अकरा ते सकाळी सात
संजय भिका सोनवणे-९४५२५६३६३७ आणि मनोहर गुलाब ठाकूर-८२६५०५६८३७ यांच्याशी आपण संपर्क साधू शकतात.