कोरोनाचा फटका; शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण

0

मुंबई: जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला आर्थिक फटका बसला आहे. जगभरातील शेअर बाजाराला कोरोनाचा फटका बसला आहे. आज शुक्रवारी १३ रोजी सकाळी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे.

मुंबई शेअर बाजारात निर्देशांकात 3090.62 अंकांची आणि 9.43 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण झाली. निफ्टीमध्येही मोठी घसरण झाल्याने एक तास बाजार बंद करण्यात आला होता. निफ्टीमध्ये 10.07 टक्क्यांनी घसरण होऊन 966.10 अंकांनी निर्देशांकात घट झाली आहे. त्यामुळे, निफ्टी 8624.05 वर येऊन पोहोचला आहे. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. त्यामुळे, याचा फटका गुंतवणूकदारांना बसला असून तब्बल 11 लाख कोटी रुपये बुडाल्याची माहिती आहे. गुरुवारी दुपारी 2.40 वाजता सेन्सेक्समध्ये 3100 अंकांची घट होऊन 32,600 वर बंद झाला होता. तर निफ्टीत 950 अंकांनी घसरण झाली असून 9,500 अंकांवर स्थिरावला होता.

दिवसाच्या गुरुवारी सुरुवातीला 1600 अंकांएवढी मोठी घसरण झाल्याने सेन्सेक्स 34000 अंकावर पोहोचला होता. निफ्टीतही 500 अंकांची घसरण होऊन तो 10 हजारांच्या खाली पोहोचला होता. भारतीय शेअर बाजाराप्रमाणेच अमेरिकेतही शेअर बाजार कोसळला आहे. अमेरिका शेअर बाजारात निर्देशांक 1400 अंकांनी कोसळल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेसह प्रमुख देशांच्या शेअर बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळाली.