कोरोनाची शंका; डॉक्टरांचे संपर्क क्रमांक जारी

0

आयएमए जळगाव शाखेचा जनहितार्थ उपक्रम

जळगाव । कोरोना विषाणूचा (कोविड-19) संसर्ग टाळता यावा यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव शाखेने एक पाऊल पुढे टाकत रुग्ण, नातेवाईक यांच्या प्रत्यक्ष वा अनावश्यक संपर्काला फाटा देत टेलिफोनिक पद्धतीने गरजूंचे शंका निरसन करणेचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून जळगाव शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू नागरिकांच्या शंकांचे निरसन, मार्गदर्शन करणार आहे. हे डॉक्टर्स त्यांच्या वेळेनुसार फोनवर कोरोना विषाणू बद्दलच्या शंकांचे निरसन करण्यासाठी उपलब्ध असतील. फोनवर कुठल्याच प्रकारच्या औषधांचा सल्ला दिला जाणार नाही. फोन न उचलल्यास व्हॉट्स अ‍ॅप मेसेज करावा. डॉक्टर्स रुग्ण तपासण्यात व्यस्त असल्यास नंतर उत्तर देतील, असे आयएमएच्यावतीने कळविण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने रुग्णांचा वेळ वाचेल, योग्य ठिकाणी औषोधोपचार मिळण्यास मदत होईल आणि संसर्गजन्य आजाराला आळा घालता येईल. रुग्ण ,नातेवाईक यांनी सहकार्य करावे.

– डॉ. धर्मेंद्र पाटील, सचिव, आयएमए, जळगाव शाखा