कोरोनाच्या काळात परीक्षा घेणे चुकीचे: राहुल गांधी

0

नवी दिल्ली: देशात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. त्यातच आता युजीसी(विद्यापीठ अनुदान आयोग)ने परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठांना आदेश दिले आहे. यावरून परीक्षा घ्यावे, घेऊ नये असे दुमत निर्माण झाले आहे. यात विद्यार्थ्यांची घुसमट होत आहे. दरम्यान आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील परीक्षा घेऊ नये असे सांगितले आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे चुकीचे आहे असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. युजीसीच्या अट्टहासामुळे विद्यार्थी गोंधळात आहे. युजीसीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या पाहिजेत अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.

युजीसीने कोणताही गोंधळ न करता वर्षभरात ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या निकालानुसार विद्यार्थ्यांना पास करावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.