कोरोनाच्या पाश्वभुमीवर आमदार शिरिषकुमार नाईकांनी घेतली बैठक

0

नवापूर : शहरातील दहा प्रभागासाठी कोरोना उपाययोजना व नियोजन बैठक आमदार शिरिषकुमार नाईक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत नवापूर नगरपालिकेतील हद्दीतील गरीब जनतेला जीवन आवश्यक वस्तुची किट प्रत्येक प्रभागात गोर गरीब नागरीकांना देण्यात येणार आहे.
तालुक्यात आज १५४० होमकोरन्टाइन साठी ठेवले आहे अशी माहीती नंदकुमार वाळेकर यांनी दिली. या कामासाठी आरोग्य विभागाची ४५ पथक काम करीत आहे. यांच्या मदतीला ३४७ अंगणवाडी सेविका, ७०० आशा आहेत.तसेच ग्रामस्तरावर आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांची नावे त्यांची माहीती तालुकास्तरावर पोहचविण्याचे काम ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंध समिती काम करीत आहे. या समिती मध्ये सरपंच ,अध्यक्ष म्हणुन तर ग्रामसेवक सचिव म्हणुन काम करीत आहे.यात
पोलिस,पाटील,शिक्षक,अंगणवाडी सेविका,कोतवाल, तलाठी हे सदस्य म्हणुन काम करीत आहे. त्यामुळे नविन आलेल्या लोकांनी तात्काळ तपासणी करुन त्यांना होमकोरन्टाइन करण्यात येत आहे.तालुक्या मध्ये आता पर्यंत एक ही कोरोना बाधीत रुग्ण नाही. यावेळी आमदार शिरिषकुमार नाईक यांनी तालुक्यातील परिस्थिती बीडीओ नंदकुमार वाळेकर यांचाकडुन जाणुन घेतली.

यावेळी नगराध्याक्षा हेमलता पाटील, उपाध्यक्ष आरीफभाई बलेसरीया,गटनेते आशिष मावची, विरोधी पक्ष नेते नरेंद्र नगराळे, राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे नगरसेवक खालील खाटीक,भाजपा नगरसेवक महेंद्र सोनार,काॅग्रेस नगरसेवक विश्वास बडोगे,हारूण खाटीक, यश अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील, राष्ट्रीय काॅग्रेस पार्टी सरचिटणीस अमृत लोहार,प्रकाश कुंभार,फारूख शाह, तानाजी वळवीआदि उपस्थित होते.