कोरोनाच्या संकटात पाचोर्‍यात २०७ जणांचे रक्तदान

0

सोशल मीडियातून जनजागृती; प्रशासनाचा तरुणाईला सॅल्यूट

पाचोरा – कोरोनामुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या संकटात सोशल मीडियात अफवांचा बाजार गरम आहे. मात्र सोशल मीडियाचा योग्य वापर करुन पाचोरा येथे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल २०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पाचोर्‍यातील तरुणांच्या या कार्याला आरोग्य विभागासह प्रशासनाने सॅल्यूट ठोकला आहे.
कृष्णापूरीतील प्रमोद बारी या तरुणाने रक्तदान करण्यासाठी एक व्हाट्सअ‍ॅप गृप तयार करुन त्याच्या ५० मित्रांना रक्तदानासाठी तयार केले. त्या तरुणांनी या उपक्रमाची दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ. युवराज परदेशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्वांना सोबत घेवून रक्तदान शिबिर घेण्याचे ठरले. यात पीबीसी मातृभूमी चॅनेलचे प्रविण ब्राम्हणे यांनी पुढाकार घेवून दि.७ रोजी पाचोरा येथे भारतीय जैन संघटना, पीबीसी मातृभूमी चॅनेल, प्रमोद बारी मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर घेतले. यावेळी २०७ रक्तदात्यांनी रक्तदान करत पाचोरा तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठे रक्तदान शिबिर घेत या पूर्वीचे सर्व उचांक मोडीत काढले. जळगाव येथील रेडप्लस संस्था व पाचोरा येथील विग्नहर्ता हॉस्पिटलच्या रक्त साठवण पेढीच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने भविष्यात रक्ताची गरज भासू शकते ही शक्यता लक्षात घेता स्वयंस्फूर्तीने रक्तदाते रक्तदानासाठी बाहेर पडले. शिबिरा दरम्यान सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यात आले. शिबिरास सर्वप्रथम आमदार किशोर पाटील यांनी भेट देत समाधान व्यक्त केले तर भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी स्वत:देखील रक्तदान केले. शिबिरास उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे,पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ, डॉ.भूषण मगर, उनगराध्यक्ष शरद पाटे, भारतीय जैन समाज संघटनेचे कांतीलाल जैन, नीरज मुनोत, दिनेश बोथरा, संजय सिसोदिया, रिंकू जैन, पाचोरा पीपल्स बँकेचे संचालक जीवन जैन, मुन्ना अग्रवाल, रितेश ललवाणी यांचे सह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या आयोजनात आर के न्युज चे राजेश धनराळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे समाधान मुळे, झेरवाल अकादमीचे प्रा.अमोल झेरवाल, खेळाडू रिझवान पठाण यांनी मेहनत घेतली. यावेळी डॉ. युवराज परदेशी, पत्रकार उमेश राऊत, राहुल महाजन, दीपक गढरी, फकिरचंद पाटील, विनायक दिवटे, महेश कौंडिण्य, निखिल मोर, विजय पाटील, शांताराम चौधरी, सुनील पाटील, नंदकुमार शेलकर, प्रमोद पाटील, गणेश शिंदे यांची उपस्थिती होती.

यशस्वीतेसाठी पीबीसी मातृभूमी परिवाराचे नितीन पाटील, प्रवीण ब्राह्मणे, नगराज पाटील, सायली पाटील, किरण अहिरे, गौतम सोनवणे, तर प्रमोद बारी मित्र परिवाराचे शरद गीते, संदीप मराठे, मनोज महाजन, रजत चौधरी, आश्विन महाजन, प्रकाश मराठे यांचेसह अनिल चांदवाणी यांनी परिश्रम घेतले.