कोरोनाला हरविण्यासाठी भारतीय लष्कराची सज्जता

0

नवी दिल्ली – भारतीय लष्कराने कोरोनाविरोधात ऑपरेशन नमस्ते सुरु केले असल्याची घोषणा लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांनी म्हटले आहे.

या विशेष मोहिमेच्या अंतर्गत लष्कराने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. साउर्थन कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, सेंट्रल कमांड, नॉर्थन कमांड, साउथ वेस्टर्न कमांड आणि दिल्ली मुख्यालय या ठिकाणी कोरोना हेल्प लाइन सेंटर तयार करण्यात आले आहेत. या केंद्रातून नागरिकांना कोरोना विरोधात लढण्यासाठी मदत उपलब्ध केली जाणार आहे. लष्कराच्या सेवेतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी ज्या भागात कोरोनाचा उद्रेक अधिक आहे तेथे तैनात केले जाणार आहे. भारतीय लष्कर आधीच्या मोहिमांप्रमाणेच ऑपरेशन नमस्ते यशस्वी करेल, असा विश्वास लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांनी व्यक्त केला आहे. तसेच भारतीय वायू सेनेने नऊ ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. या प्रत्येक कक्षात 300 रुग्णांची सोय होऊ शकते.