कोरोना आपली परीक्षा पाहतोय, संयम ठेवा: मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे भावनिक आवाहन

0

मुंबई: जगभरात कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. भारतात आता तीन हजाराजवळ कोरोनाची संख्या गेली आहे. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहे. हे संख्या साडेपाचशेच्या वर गेली आहे. दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत संयम बाळगण्याचे आवाहन केले. कोरोना हा विषाणू आपली परीक्षा घेत असून या परीक्षेत फक्त संयम बाळगण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा एक युद्ध असून आपण याला घरी बसूनच हरविणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. आवश्यक सेवा 24 तास सुरू असून कोठेही गर्दी करू नका. प्रत्येक जिल्ह्यात कोरोनासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून लक्षणे दिसल्यास इतर रुग्णालयात न जाता त्याठिकाणी जाण्याचा सल्लाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला.

सोनिया गांधी, मोदींशी चर्चा

या महामारीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात आपण असून त्यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन आणि मदत मागत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.