कोरोना इफेक्ट : खिर्डीतील दत्त यात्रोत्सव रद्द

0 2

खिर्डी : सालाबादाप्रमाणे चैत्रशुद्ध पंचमीला खिर्डी येथे श्री दत्ताची यात्रा भरते मात्र राज्यात लॉकडाऊन व कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाने लग्न समारंभ यात्रा व इतर कार्यक्रम रद्द केल्याने रविवार, 12 रोजीचा यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णया यात्रोत्सव समितीने घेतला आहे. एक दिवस आधी श्री दत्ताची पालखी सपूंर्ण गावातून सवाद्य फिरवली जाते तसेच पंचमीला गावात मोठी यात्रा भरते मात्र कोरोनाच्या वाढते प्रमाण बघता गावातील सीतीने निर्णय समितीने केवळ महानुभाव पंथीय युवा संत प्रदीप महाराज यांच्या हस्ते मंदीरात फक्त नैवेद्य दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

यात्रोत्सव रद्द : दुकाने न लावण्याचे आवाहन
खिर्डी गावचे लोकनियुक्त सरपंच गफुर कोळी पोलिस पाटील अरुण पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रजीत पाटील, माजी उपसरपंच शेनु पाटील, वामन भंगाळे, प्रल्हाद नेमाडे, मनोहर पाटील, राजेंद्र नेमाडे, राजेंद्र पाटील व गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे तसेच यात्रात्सव रद्द केल्याने कोणीही गावात दुकाने लावू नये, असे आवाहन निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी केले आहे.