कोरोना इफेक्ट : रावेरसह रसलपूर व अहिरवाड्याच्या बारागाड्यांना ‘ब्रेक’

0

रावेर : रावेर शहरात बारागाड्या ओढण्याच्या परंपरेला इतिहासात प्रथमच कोविड 19 (कोरोना) मुळे ब्रेक लागला आहे शिवाय तालुक्यातील अहिरवाडी तसेच रसलपूर येथे अक्षय तृतीया निमित्त बारागाड्या ओढण्याची परपंरा असलीतरी गर्दी टाळण्याच्या पार्श्‍वभूमीवर बारागाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. देशभरात कोरोनाचा दिवसागणिक शिरकाव वाढत असून अनेक जण बाधीत होण्यासह काहींचा दररोज मृत्यूदेखील ओढवत आहे. अशा पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सींग नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून यात्रोत्सव तसेच सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे अक्षय तृतीयानिमित्त तालुक्यातील रावेर शहरातील शिवाजी चौक तसेच रसलपूर व अहिरवाडी येथे बारागाड्या ओढण्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे.