कोरोना उपाययोजना: उद्धव ठाकरेंची मोदींसोबत फोनवरून चर्चा

0

मुंबई: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा भारतात झपाट्याने फैलाव होत आहे. महाराष्ट्रात दररोज रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील शाळा, महाविद्यालये, मॉल्स, स्विमिंगपूल, नाट्यगृहे, सिनेमागृहे बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. दरम्यान कोरोनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचे वृत्त एएनआयने सूत्राच्या हवाल्यानुसार दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात करोना व्हायरसमुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे याचा आढावा घेतला. तसेच सुरक्षेचे काय उपाय योजता येतील यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे.

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ३२ झाली आहे. शनिवारच्या एका दिवसात महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १२ रुग्णांनी वाढली होती. तर आज रविवारी औरंगाबादमध्ये एका ५९ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.