कोरोना: जि.प. समाजकल्याण सभापती दोन महिन्याचे वेतन देणार

0

जळगाव: जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतात याचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. यासाठी मदतीचा ओघ वाढला आहे. दरम्यान जळगाव जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे यांनी दोन महिन्याचे वेतन दिले आहे. जयपाल बोदडे यांची काही महिन्यापूर्वी समाजकल्याण सभापती म्हणून निवड झाली आहे. समाजकल्याण सभापती म्हणून त्याांनी उत्तम कामगिरी सुरू केली आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी मदतीचे आवाहन केले आहे, त्यानुसार मदत देण्यात येत आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून मदत मिळत आहे.