कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृतीसाठी मुस्लिम तरुण सरसावले

0

पोलिसांना सहकार्य करण्याचे समाजाला केले आवाहन !

मुक्ताईनगर : विश्वभरात कोरोना विषाणू संसर्गजन्य महामारीने मृत्यूचे थैमान माजून हाहाकार उडालेला असताना संपूर्ण देशात संचारबंदी लागू असतानाच दिल्ली येथील निजामुद्दीन तब्लिकी प्रकरण उघडकीस येऊन त्यात जवळपास साडेसहाशे बाधित मुस्लिम युवक आढळून आल्याने देशभरात विविध ठिकाणी त्याच्या गंभीर प्रतिक्रिया उमटलेल्या असतानाच मुक्ताईनगर येथील मुस्लीम युवकांनी खरी राष्ट्रभक्ती दाखवत पुढे येत समाजातील अज्ञान वृत्तीने लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून समाजात जनजागृती करण्यासह स्थानिक पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्वतः पोलीस स्टेशनला येऊन पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या केलेल्या चर्चेत व्यक्त केल्याने प्रशासकीय स्तरावर व सोशल मीडियात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कुटुंब व देशाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सरसावले मुस्लीम तरुण
मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक मुस्लिम बहुल गावात तसेच शहरात देशाच्या या प्रतिकुल परीस्थितीत राष्ट्रीय एकात्मता जोपासली जावी, सर्वसामान्य मुस्लिम समाजामध्ये कोरोना विषाणू संदर्भात जागृती व्हावी तसेच समाजात फैलावलेल्या विकृत अफवेला बळी न पडता स्वतः , कुटुंब व देशाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शहरातील मुस्लिम तरुण पुढे सरसावले आहे. शिवसेना प्रणित अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खान इस्माइल खान ,नगरसेवक तथा माजी शिक्षण सभापती शेख शकील सर, माजी आरोग्य व स्वच्छता सभापती मस्तान कुरेशी, माजी ग्रा पं सदस्य शकूर जमदार ,हारुन शेख ,शकील मेंबर ,आरिफ आझाद, मुशीर मन्यार, माजी उपसरपंच जाफर अली, कलिम मणियार , लुकमान बेपारी , युनुस मेहबूब ,शरीफ मेकॅनिक, जहीर शेख ,नूर मोहम्मद , व वसीम शेख या प्रमुख मुस्लिम युवक व कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांची भेट घेत उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस व आरोग्य प्रशासन जीवापाड प्रयत्न करत आहेत. त्यात सहकार्य करणे तसेच शासनाच्या निर्देशांचे व सुचनांंचे पालन करणे, मशिदीमध्ये अथवा कोणाकडे बाहेरील कोणी व्यक्ती आल्यास त्याची माहिती पोलीस स्टेशनला देणे. कोरोना विषाणूच्या लक्षणे कोणात आढळून आल्यास आरोग्य विभागाला माहिती देणे यासह विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली. समाजात वेळोवेळी जनजागृती करू असे सांगितले . या प्रसंगी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी देखील सर्वांना विद्यमान परीस्थितीत जातीय सलोखा व धार्मिक सलोखा टीकवणे, विषाणूला हरवण्यासाठी बाहेरून कोणी आपल्याकडे किंवा मज्जित मध्ये येत असेल तर त्याची माहिती देणे यासारख्या विषयांचे निर्देश व मार्गदर्शन दिले. याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक कैलास भारसके, पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळुंके, पो कॉ मुकेश घुगे , अविनाश पाटील उपस्थित होते