कोरोना: महाराष्ट्रात पुन्हा चार रुग्ण पॉझिटिव्ह; एकूण संख्या…

0

मुंबई: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव भारतातही वाढत आहे. दररोज रुग्ण संख्येत वाढ होत आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले आहे. काल कोरोना बाधितांची संख्या ३३ वर होती, ती आता ३७ वर पोहोचली आहे. आज नव्याने चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. नवी मुंबई, मुंबई भागात चार रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्राचे आरोग्य प्रधान सचिव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.