कोरोना रुग्णाच्या संपर्कातील डॉक्टर घरातच क्वारंटाइन

0

जळगाव– मेहरूण परिसरातील ४९ वर्षीय नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयात तपासणीपूर्वी हा रुग्ण एका खासगी मोठ्या रुग्णालयात गेला होता. त्यामुळे या डॉक्टरलाही प्रशासनातर्फे घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मुंबईहून परतल्यानंतर संबंधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा शहरातील एका प्रसिद्ध मोठ्या रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. तपासणीच्या दोन दिवसानंतर शुक्रवारी, हा रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. या ठिकाणी वैद्यकीय पथकातर्फे त्याचे नमुने घेऊन तपासासाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. शनिवारी हा रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. हा रुग्ण जळगावात किती आणि कोणत्या लोकांच्या संपर्कात आला आहे याची माहिती प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी संबंधित रुग्ण जळगाव शहरातील ज्या मोठ्या खासगी रुग्णालयात तपासासाठी गेला होता तेथील डॉक्टरला घरातच क्वारंटाइन राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच त्यांचे रुग्णालय बंद ठेवण्यात आले आहे.

‘त्याच्या’ संपर्कातील २२ जण तपासणीसाठी रुग्णालयात

तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबियांसह एकूण बावीस जणांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे .त्यांचे नमुने घेण्यासह पुढील कार्यवाही प्रशासनातर्फे सुरू असल्याचे वृत्त आहे. हे सर्वजण मनपाच्या शाहू महाराज रुग्णालयात दाखल असल्याचेही समजते.

मेहरूण परिसरात सर्व्हे सुरू

खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मेहरूण परिसरात प्रशासनातर्फे आवश्यकत्या सर्व भावना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत . महापालिकेला संबंधित सर्व परिसर सेनेट राइज करण्याच्याही सूचना आहेत . जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार रविवारी मेहरुण परिसरात घराघरात जाऊन नागरिकांची ते पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले आहेत किंवा नाही याबाबत विचारपूस केली जात आहे. दरम्यान पाटो रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मशिदीत नमाज पठणासाठी ही गेल्याची माहिती असुन मशिदित हजर असलेल्याचाही प्रशासनाकडुन शोध घेतला जात आहे.

मेहरूण परिसरात सर्व्हे सुरू

खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मेहरूण परिसरात प्रशासनातर्फे आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रविवारी मेहरुण परिसरात घरोघरी जाऊन कोणी कोरोनाबधिताच्या संपर्कात आले आहे किंवा नाही याबाबत विचारपूस केली जात आहे. दरम्यान हा रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी एका सामूहिक प्रार्थनेत गेल्याची माहिती आहे. यावेळी प्रार्थनास्थळी हजर असलेल्यांचा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे.

दरम्यान, जळगाव शहरातील एका डॉक्टरला क्वारंटाइन करण्यात आल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दुजोरा दिला आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याच्या, तसेच मेहरूण परिसर सॅनिटाइझ करण्याच्या सूचना मनपाला देण्यात आल्या आहेत. या भागात गर्दी होऊ न देण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचेही डॉ. ढाकणे यांनी स्पष्ट केले.