कोरोना : रुग्णाच्या सेवेत हलगर्जीपणा केल्यास कारवाई

0

जिल्हाधिकारी यांचे आदेश ; प्रशासन सज्ज

जळगाव : जगभरात खळबळ माजविलेल्या कोरोना या आजाराबाबत जळगाव जिल्हाप्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात येत आहे. त्याचे एक पाऊल म्हणून जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षासह, कोरोना रुग्ण पॉसिटीव्ह निघाल्यास त्याची स्वतंत्र व्यवस्था तसेच त्याच्या देखभालीसह त्याला मनोरंजनाची साधणे उपलब्ध करनु देण्याचे आदेश देण्यात आले आहे. संबंधित रुग्ण रुग्णालयातून बाहेर निघून गेल्यास तसेच त्याच्या देखभालीसह सुविधा देण्यात हलगर्जीपणा झाल्यास शासकीय वैद्यकीय वमहाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना जबाबदार धरण्यात येवून नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या पत्रानंतर स्वतः अधिष्ठाता यांनी जिल्हा रुग्णालय आवारात नेत्रकक्ष येथे स्वतंत्र कोरोना बाधीत रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाची पाहणी करुन माहिती घेतली.

कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी याबाबत पत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिले आहे. पत्राला प्रधान सचिव यांच्या पत्रांचा संदर्भ देण्यात आला आहे या पत्रानुसार असे की, कोरोना विषाधू बाधित व संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तसेच या कक्षामध्ये सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. तसेच रुग्णांना कक्षाशी संपर्क करणे सोयीचे व्हावे, यासाठी कक्षामध्ये नेमण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी, त्यांचे सहायक अधिकारी, व कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यांचे नाव, मोबाईल, नंबर ईमेल, पत्ता, रुग्णवाहिका क्रमांक सहजपणे दृष्टीस पडले अशाप्रकारे बोर्डावर प्रदर्शित करण्यात यावेत. तसेच त्यास प्रसिध्दी देण्यात यावे, असे म्हटले आहे.

कक्षाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

कोरोना विषाणू बाधीत व संशयित रुग्णांना वेळावेळी पुरेसे जेवण, नाश्ता, चहापाणी यांची काळजीपूर्वक व्यवस्था करण्यात यावी, रुग्णांना मनोरंजनासाठी कॅरम बोर्ड, टीव्ही, वाचन साहित्य उपलब्ध करुन द्यावे असेही पत्रात म्हटले आहे. तसेच रुग्ण कोणत्याही प्रकारे स्वतंत्र कक्षातून बाहेर पडणार नाही, यासाठी 24 तास दोन सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात यावी, रुग्ण कक्षातून बाहेर गेल्यास तसेच देखभालीसह सुविधा देण्यात हयगय तसेच हलगर्जीपणा झाल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालाचे अधिष्ठाता यांना जबाबदार धरण्यात येवून नियमानुसार कारवाई करण्यात येईल,असेही पत्रात म्हटले आहे.

20 बेड असलेला स्वतंत्र कोरोना कक्षाची रचना

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या भेटीत स्वतंत्र कक्ष असावा याबाबत सुचना केल्या होत्या त्यानुसार कोरोना बाधीत रुग्णांसाठी नेत्र कक्ष येथे 20 बेड असलेला कक्षाची रचना करण्यात आली आहे. या कक्षात जावून येथील सुविधा तसेच सोयीबाबत अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी स्वत भेट देत पाहणी केली. तसेच माहिजी जाणून घेतली. याठिकाणी रुग्ण बाहेर जावू नये म्हणून एक पोलीस कर्मचारी, तसेच दोन सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात बाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचेही डॉ. खैर यांनी बोलतांना सांगितले.