कोरोना : रेल्वेसह भुसावळातील गुन्हेगारीत घट

0

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरीक घरात बंदीस्त असलेतरी भुसावळकरांसाठी एक सुखद बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून एस.टी.बसेस तसेच रेल्वे रद्द झाल्याने रेल्वेतील गुन्हेगारी थांबली आहे शिवाय भुसावळातदेखील वाढणार्‍या चोर्‍या-घरफोड्यांना ब्रेक लागला आहे.

भुसावळ गुन्हेगारीचे जंक्शन
देशभरात जाण्यासाठी भुसावळातून रेल्वे गाड्या असल्याने भुसावळ लोहमार्ग पोलित ठाण्यात दररोज मोबाईल चोरी, हाणामारी, मौल्यवान वस्तूंची चोरी, प्रवाशांचा विनयभंग आदी गुन्ह्यांची दररोज नोंद होते मात्र गेल्या आठवडेभरापासून गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण शून्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भुसावळकरांनाही दिलासा : चोर्‍या थांबल्या
शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र सुरू होते तर पोलिसांकडून गस्त राबवल्यानंतरही चोरटे गस्त भेदून आपले काम फत्ते करीत असल्याने व्यापारी तसेच पोलिसांचा ताण वाढला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली नसल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले. एरव्ही भुसावळात चोर्‍या-घरफोड्यांसोबत हाणामारी, आत्म्हत्या, अपहरण, अल्पवयीन तरुणीला पळवून नेणे, बलात्कार, खून, फसवणूक, विनयभंग यासारख्या घटना जणू नित्याच्या झाल्या आहेत मात्र कोरोनामुळे या घटनांना चक्क आळा बसला आहे. कोरोना विषाणूंचा धसका चोरट्यांनी चांगलाच घेतल्याचेही उपसाहाने बोलले जात आहे.