कोरोना विषाणू गिळून फडणवीसांनी ढेकर दिला असता का? शिवेसना

0

मुंबई: राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या काळात महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांसारख्या अनुभवी नेत्याची गरज असल्याचे वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेत्यांवर शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी वेगळे काय केले असते? कोरोनाचा विषाणू गिळून ढेकर दिला असता का? असा संतप्त प्रश्न शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे.

पुढे आपल्या अग्रलेखात शिवसेनेनेकोरोना विषाणूच्या मागे सीबीआय, ईडी वगैरे लावून त्याची बोलती बंद केली असती? महाराष्ट्रात सीबीआय, ईडी वगैरेतून निर्माण झालेला सूडाचा विषाणू ठाकरे सरकारने मारला तसा कोरोना विषाणू मारला जाईल. तोपर्यंत विरोधी पक्षाने नाकावरचा मास्क तोंडात बोळा म्हणून वापरावा,’ असा टोला शिवसेनेने दिला आहे. उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव शून्य असून महाराष्ट्राला फडणवीसांची गरज असल्याचे भाजपचे नेते निरंजन डावखरे यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार शिवसेनेने घेतला आहे.

संपूर्ण देश, आपला महाराष्ट्र कोरोना व्हायरसशी एक युद्ध म्हणून लढत आहे. जनतेच्या जिवाशी खेळणार्‍या विषाणूशी इतका मोठा लढा महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मंत्रिमंडळ मोठी झुंज देत असताना भाजपातील काही उपर्‍या अक्कलवंतांनी टीकेची निरांजने ओवाळली आहेत. हवस के शिकार असा एक ड दर्जाचा चित्रपट खूप वर्षांपूर्वी येऊन गेला. भाजप महाराष्ट्रात जो विकार बळावू पाहत आहे तो म्हणजे राजकीय ‘हवस के शिकार’ म्हणावा त्यातलाच प्रकार असल्याचे म्हटले आहे.