कोरोना व्हायरस: भारतीय रहिवासी दिल्लीत दाखल !

0

वोहान: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. संपूर्ण जगात आता कोरोनाची लागण होऊ लागली आहे. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दरम्यान चीनमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने विशेष विमान पाठविले होते. विद्यार्थी, नागरिक भारतात परतले आहे. ३२३ भारतीय नागरिक दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहे. ७ मालदीवचे नागरिक देखील दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहे. आणखी भारतीय नागरिक चीनमध्ये अडकले असतील, तर त्यांना भारतात आणण्याची व्यवस्था भारत सरकार करणार आहे.

दुसरीकडे पाकिस्तानचे काही विद्यार्थी चीनमध्ये आहेत, परंतु पाकिस्तान सरकार त्यांना परत मायदेशात आणण्यासाठी कोणत्याही हालचाली करत नसल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानी विद्यार्थी आम्हाला परत न्या अशी गयावया करताना दिसत आहे. व्हिडीओ समोर आला आहे, यात एक पाकिस्तानी विद्यार्थी गयावया करताना दिसत आहे. भारतासहित इतर देशाच्या सरकारने येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या नागरिकांना परत नेण्याची व्यवस्था केली आहे, मात्र पाकिस्तान सरकारकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहे. या विद्यार्थ्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, लष्कर प्रमुख, न्यायाधीश यांना आम्हाला परत नेण्यासाठी व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.