कोरोना संदर्भात खासदार उन्मेश पाटीलांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा

0

जळगाव — कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार उन्मेश पाटील यांनी
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अन्न धान्य पुरवठा नियोजन लवकर व्हावे, उज्वला योजनेतून गॅस सिलिंडर पुरवठा तसेच जिल्ह्यातील अ ब क नगरपरिषदाना व महानगरपालिका यांना वित्त आयोगाच्या निधीतून पंधरा लाख, दहा लाख आणि पाच लाख रुपये औषधी फवारणी आदी कामासाठी खर्चाची मुभा, तसेच औषधी फवारणी करीता ग्रामपंचायतींना देखील वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करावयाची मुभा, कोरोनाच्या बाबत खासदार निधीतुन कोरोनाबाबत वैद्यकीय सुविधाबाबत चर्चा केली. यावेळी जळगावचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी घोषित केलेल्या एक लाख सत्तर हजार कोटींच्या विविध मदतीची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत सुुुचना केल्या.