कोरोना संशयिताच्या मृत्युचे कारण अद्याप निश्चित नाही

0

जळगाव – कोरोना संशयित म्हणून काल जिल्हा सामन्य रुग्णालयातील कोविड-19 वार्डमध्ये दाखल झालेल्या व्यक्तींचा रात्री 11 वाजेच्या सुमारास मृत्यु झाला आहे. सदर व्यक्तीच्या मृत्युचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जावू नये. असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी केले आहे. सोमवार, दि. 30 मार्च, 2020 रोजी सायंकाळी 6.30 वाजता जिल्हा सामन्य रुग्णालयातील कोविड-19 वार्डमध्ये 52 वर्षाच्या पुरुष रुग्णाला कोविड-19 संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. हा रुग्ण उपचारादरम्यान रात्री 11.00 वाजता मृत्यू पावला आहे. या रुग्णाचे स्वॅबचे नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत कोविड-19 च्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नमुन्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला आहे हे निश्चित करता येत नाही. असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.