कोरोना संशयित १७४ जणांचे अहवाल निगेटीव्ह

0

२४ तपासणी अहवाल येणे बाकी : १८ संशयित रूग्ण दाखल

जळगाव- जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल होणार्‍या रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान आत्तापर्यंत २०२ जणांपैकी १७४ जणांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आज नव्याने १८ संशयित रूग्ण दाखल झाले आहे. कोरोना रुग्णालयात आतापर्यंत ३ हजार २२४ जणांची स्क्रीनिंग तपासणी करण्यात आली आहे. तसेच २०२ जणांची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी १७४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. तर आज नव्याने १८ संशयित रूग्ण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २४ संशयित रूग्णांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे. आज १८ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आज दिवसभरात ९७ जणांची स्क्रीनींग तपासणी करण्यात आल्याचे डॉ. भास्कर खैरे यांनी कळविले आहे. गुरुवारी मृत्यू झालेल्या महिलेच्या तपासणी अहवालाची अद्यापही प्रतिक्षा आहे.