Sunday , March 18 2018

कोलकाता पोलिसांचे बीसीसीआयला पत्र

नवी दिल्ली । भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर त्याची पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप करत त्याच्याविरुद्ध कोलकाता पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. हसीनच्या या तक्रारीनंतर कोलकाता पोलिसांनीही आपल्या कारवाईस सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात कोलकाता पोलिसांनी आता थेट बीसीसीआयशी पत्रव्यवहार केला आहे. कोलकाता पोलिसांनी बीसीसीआयकडून नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेतील दौर्‍यातील मोहम्मद शमीच्या प्रवासाची माहिती मागवली आहे. दरम्यान, हसीन जहाँने मोहम्मद शमी आणि त्याच्या परिवाराविरुद्ध जादवपूर पोलीस स्थानकात नोंदवलेल्या तक्रारीनंतर शमीशिवाय त्याच्या कुटुंबीयातील अन्य चार सदस्य कोण आहेत, याचा खुलासा पोलिसांनी अद्याप केलेला नाही. पोलिसांनी ज्या कलमांच्या आधारावर गुन्हे नोंदवलेले आहेत त्याआधारावर मोहम्मद शमी आणि त्याच्या परिवाराला अटक जवळ जवळ नक्की समजली जात आहे. न्यायलयाने अंतरिम जामीन दिला तरच ही अटक टळू शकते. शनिवारी शमीवर एफआयआरदेखील दाखल झाला आहे.

पोलिसांचे पत्र
पोलिसांनी बीसीसीआयला पत्र लिहून शमीच्या आफ्रिकेच्या दौर्‍याची विस्तृत माहिती मागितली आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेत शमी भारतीय संघासोबत विमानात असायचा का? की, स्वखर्चाने इतर विमानाने त्याने प्रवास केला, याची विचारणा केली आहे. याशिवाय मोहम्मद शमी संघासोबत दुबईला गेला होता की एकटाच गेला होता असा सवालही पोलिसांनी विचारला आहे.

तर तलाक मिळाला असता
हसीन जहाँ म्हणाली की, शमी मला सोडून उत्तर प्रदेशमध्ये जाणार होता. त्याचा फोन मला मिळाला नसता तर त्याने मला आतापर्यंत तलाक दिला असता. बीएमडब्ल्यू गाडीतील सर्व पुरावे असलेला फोन मला मिळाला आहे हे शमीला कळल्यानंतर त्याच्या वागण्यात बदल झाला, असे हसीन जहाँ म्हणाला.

तो मुलगा कोण
शमी आणि हसीनच्या वादात आता नवीन गोष्ट समोर आली आहे. शमी आणि हसीन यांचा वाद आता वाढतच चालला आहे. हसीन रोज पत्रकार परिषद घेऊन शमीवर नवेनवे आरोप करत आहे. हसीनच्या आरोपांवर शमी काहीही बोलत नाहीये. हसीन कोणाच्या तरी सांगण्यावरुन हे करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत या वादात एक पाकिस्तानी मुलगी होती, पण आता एका नव्या मुलाची या वादात एन्ट्री झाली आहे. हसीन एका मुलाच्या संपर्कात आहे आणि तोच तिला भडकावत असल्याचे बोलले जात आहे. हसीन ही शमीकडून मागील 2 महिन्यांपासून 50 कोटींची मागणी करत असल्याचेदेखील बोलले जाते.

हे देखील वाचा

होय … मी अलिश्बाला दुबईत भेटलो होतो

कोलकाता । मोहम्मद शमी हा दुबईमध्ये पाकिस्तानच्या अलिश्बा नावाच्या मुलीला भेटला होता. त्याचबरोबर अलिश्बाकडून शमीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *