कोळवदच्या विवाहितेचा छळ : पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल

0

यावल : तालुक्यातील कोळवद येथील माहेर असलेल्या 28 वर्षीय विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दीपाली अमोल खाडे (28, या कोळवद) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, 14 जून 2018 रोजी अमोल रमेश खाडे (रा.आळंदा, रूस्तमाबाद, ता.बार्शी टाकळी जि. अकोला) यांच्याशी लग्न झाल्यानंतर सासरे रमेशराव खाडे त्यांचे निधन झाल्यानंतर पती अमोल खाडे, सासू निर्मलाबाई खाडे, पंकज घाटाळे, आते सासरे दिनकर नागे, प्रिया घाटाळे, आते सासू इंदुबाई नागे, गुणवंत घाटोळे (सर्व रा. आळंदा (रूस्तमाबाद, ता.बार्शी टाकळी जि.अकोला) यांनी विवाहितेला तू अपशकुनी आहे, तुझ्या पाय गुण चांगला नाही, तुझ्यामुळेच तुझे सासरे मेले असे म्हणत तिला मारहाण व मानसिक छळ सुरू करण्यात आला. त्रास असह्य झाल्याने विवाहितेने अखेर सोमवारी पोलिस ठाण्यांमध्ये पतीसह सात जणांविरुद्ध छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मेहबूब तडवी करीत आहे.