क्रांतीदिनी भुसावळसह रावेर शहर बंदची सकल मराठा समाजातर्फे हाक

0

बाजारपेठ बंद असल्याने शेतमाल विक्रीसाठी न आणण्याचे आवाहन

भुसावळ- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागण्यासाठी क्रांतीदिनी गुरुवार, 9 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये भुसावळ व रावेर शहरातील सकल मराठा समाजबांधव सहभागी होणार असून शांततेच्या मार्गाने पुकारण्यात येणार्‍या बंदमध्ये व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन दोन्ही ठिकाणी झालेल्या पत्रकार परीषदेत मराठा समाजबांधवांनी केले.

भुसावळ शहर बंदची हाक
भुसावळ- सकल मराठा समाजाने क्रांतीदिनी शहर बंदची हाक दिली आहे. शहरातील व्यापारी संघटना, हॉकर्स, पेट्रोल पंप चालक, शैक्षणिक संस्था, वकील संघ, मार्केट कमेटी, सराफ असोसिएशन, ऑटो रीक्षा संघटना यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी व्ळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी बाजारपेठ बंद राहणार असल्याने शेतकर्‍यांनी शेती माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती
शहरातील शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी सायंकाळी सकल मराठा समाज बांधवांची बैठक झाली. याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, नगरसेवक व अ‍ॅड.तुषार पाटील, नगरसेवक राहुल बोरसे, मराठा समाजाचे अध्यक्ष रवींद्र लेकुरवाळे, खडका ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्‍वर आमले, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद पाटील, मराठा समाज कोषाध्यक्ष पवन उगले, श्रीकांत बरकले, प्रमोद पाटील, किरण पाटील, रूपेश पाटील, विजय कलापुरे, योगेश जाधव, विकास साबळे, आदित्य पाटील, नरेश पाटील, रवी ढगे, ईश्‍वर पवार, संजय शिंदे, गजेंद्र ठाकरे, सुनील पाटील व मराठा समाजबांधव उपस्थित होते.

रावेरात स्वयंस्फूर्तीनेे दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन
रावेर- शहरातही गुरुवार, 9 रोजी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. व्यापार्‍यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून मराठा क्रांती मोर्चाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले असून मराठा समाजातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून ग्रामीण भागातील समाज बांधवांनी ग्रामीण भाग बंद ठेवावा व प्रशासनाने बंदबाबत सहकार्य करावे, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परीषदेने आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी उपन्न बाजार समिती सभापती नीळकंठ चौधरी, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, संभाजी बिग्रेडचे योगेश महाजन, किशोर पाटील, विलास ताठे, सूर्यभान चौधरी, डॉ.सुरेश पाटील आदी मराठा समाजबांधव उपस्थित होते.