Friday , February 22 2019

क्रिकेटचा सामना सुरु असताना तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पिंपरी-चिंचवड : क्रिकेटचा सामना सुरु असताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ही घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून वसीम अजीज मुलाणी असं या ३२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हिंजवडीतील कासारसाई येथील क्रिकेट मैदानावर वसीम काम करत असलेल्या कंपनीने क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. सायंकाळी चारच्या सुमारास स्पर्धेचा शेवटचा क्रिकेट सामना सुरू होता. वसीम फलंदाजी करून झाल्यानंतर मैदानात एका बाजूला बसला होता. क्रिकेट सामना सुरु असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. मैदानात रुग्णवाहिका आणि डॉक्टर होते. त्यांनी वसीमला तातडीने वाकड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला मृत्यूचे कारण स्पष्ट होत नव्हते. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असता मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बसस्थानकातून चार लाखांचे दागिने असलेली बॅग लांबवली

जळगाव | जळगाव येथील नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातून 411006 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!