क्लिअरट्रीपचा युरोप आणि दक्षिण आशियामध्ये व्यवसाय विस्तार

0

मुंबई :- प्रवास आणि पर्यटनाचा ऐषोआरामी अनुभव मिळवून देणारा भारतातील प्रमुख मंच क्लिअरट्रीपने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या व्यवसायाचा विस्तार केला असून क्लूक (Klook) आणि म्युझमेंट (Musement) या जागतिक स्तरावरील दोन प्रमुख अक्टिव्हिटी प्लॅटफॉर्म्सबरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. या नव्या भागीदारीमुळे क्लिअरट्रीपकडून प्रवासी-पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पर्यायांमध्ये युरोपातील ४८ आणि दक्षिण पूर्व आशियातील १८ देशांतील खास निवडलेल्या संपूर्णतया नव्या आणि अधिक आकर्षक ठिकाणांची व अनुभवांची भर पडणार आहे.

क्लिअरट्रीपकडून भारतातून बाहेर जाणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय प्रवासाचा अनुभव मिळवून दिला जातो. त्याचबरोबर आता युरोप व दक्षिणआशियाई प्रवाशांना भारतामध्येही अशाचप्रकारच्या बुकिंग्जचे पर्याय उपलब्ध करून दिले जाणार असल्याने भारतीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांनाही गती मिळणार आहे. गेल्या तिमाहीमध्ये भारतातील २०० शहरांतील ९० विरंगुळ्याच्या ठिकाणांची भर क्लिअरट्रीपकडील गंतव्यस्थानांच्या यादीत पडली असून इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटन उपक्रम आणि अनुभव देऊ करणारी क्लिअरट्रीप ही भारतातील एकमेव OTA (ओपन ट्रीप अलायन्स) कंपनी आहे.

क्लिअरट्रीपचे कार्यकारी उपाध्यक्ष आनंद कंददाई म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पर्यटनपटावर आपले स्थान बळकट करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये क्लूक आणि म्युझमेंटबरोबर केलेल्या भागीदारीचा महत्त्वाची भूमिका असणार आहे. या प्रयत्नांची सुरुवात आम्ही युरोप आणि दक्षिणपूर्व आशिया या जगातील प्रमुख पर्यटन बाजारपेठांपासून करत आहोत. या उपक्रमांद्वारे आम्ही देशाबाहेर जाणाऱ्यरा ग्राहकांना आपली सेवा देऊ शकणार आहोतच पण त्याचबरोबर आमच्या मंचाद्वारे भारत व मध्यपूर्व प्रांतातील अशा खास ठिकाणांचा आणि उपक्रमांचा परदेशी पर्यटकांमध्ये प्रचार करणे आम्हाला शक्य होणार आहे ही त्याहूनही चांगली बाब आहे.”