खंडव्यातील वॉण्टेड आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ- दरोड्याच्या गुन्ह्यात खंडवा रेल्वे पोलिसांना हवा असलेला आरोपी भुसावळातील असल्याची गुप्त माहिती खंडवा पोलिसांनी कळवल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे एएसआय आनंदसिंग पाटील, हवालदार सुनील जोशी, विकास सातदिवे यांनी आरोपीच्या खडका रोडवरून मुसक्या आवळल्या. शाहरुख शहा शहंशा शहा (23, रा.खडका रोड, ग्रीन पार्क, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपीस खंडवा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.