खडसे हे आमचे जुने सहकारी, त्यांना भेटणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याने ते पक्ष सोडणार अशी चर्चा आहे. काल खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते आज शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. मी त्यांना भेटणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी काल दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याशी फोनवर चर्चा देखील केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.