ADVERTISEMENT
मध्यरात्रीची घटना : परीसरात प्रचंड दहशत
रावेर : तालुक्यातील खानापूर येथे एका 20 वर्षाच्या युवकास मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने जिवंत जाळन्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परीसरात मोठी खळबळ उडाली. खानापुर येथील रहिवासी संदीप अशोक धांडे हा आपल्या वाडयात रात्री झोपलेला असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन झोपलेल्या अवस्थेत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर भाजला असून त्याला रात्री सावदा येथील एका खाजगी हॉस्पीटलला हलवन्यात आले आहे