खामखेडा येथून दुचाकी लांबवत सुट्या भागांची चोरी

0 1

मुक्ताईनगर- तालुक्यातील खामखेडा गावातून चोरट्यांनी दुचाकी लांबवत गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर तिला उभे करून तिचे सुटे भाग लांबवल्याची घटना 2 रोजी पहाटे घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार मधुकर सोनू गवते (55, रा.खामखेडा, ता.मुक्ताईनगर) यांची दुचाकी (एम.एच.19 डी.डी.7919) ही घराबाहेर लावली असताना चोरट्यांनी ती लांबवत गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर उभी करीत तिचे दोन्ही चाक, शॉक अप, बॅटरी, आरसे व स्पेअर पार्ट लांबवले. 16 हजारांचे स्पेअर पार्ट चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय सुभाष पाटील करीत आहेत.