खासदार उन्मेश पाटीलांकडून कोरोनासाठी एक कोटींचा निधी

0

जळगाव:देशात कोरोनाच्या विषाणूजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकवीस दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. भारताने या महामारीच्या विरोधात केलेल्या उपाययोजना जगात अधिक प्रभावी ठरली आहे. या देशव्यापी लॉकडाऊन काळात नागरिकांच्या सोयी सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे . केंद्र व राज्य सरकारने कॊरोनाशी मुकाबला करण्यासाठी कंबर कसली असून आज केंद्रीय पेट्रोलीयम प्राकृतिक गॅस व सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश पाटील यांनी आपली जबाबदारी निभावत पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी स्थानिक विकास निधीतून एक कोटींची मदत केंद्र सरकारकडे जमा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन आजवर सहकार्य केले आहे यापुढे देखील कोरोनाला हद्दपार करण्यासाठी घराबाहेर पडू नका असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.