खासदार गावित यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रास्तारोको

0

धुळे- काल नंदुरबारच्या खासदार डॉ.हिना गावीत यांच्या वाहनावर मराठा आंदोलनकर्त्यांनी हल्या केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी बांधवांनी आज शिरपूर तालुक्यातील सांगवीजवळ राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा यांनी सहभाग घेतला.

आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर टायर टाळले. अचानक झालेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोनही बाजुंची वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान दुपारी शिरपूर येथे या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.