खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर होताच पदाधिकार्‍यांचा जल्लोष

0

भुसावळ विभागात फटाक्यांची जोरदार आतषबाजी

भुसावळ- रावेर लोकसभेसाठी खासदार रक्षा खडसे यांना भाजपातर्फे पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुसावळ विभागातर्फे पदाधिकार्‍यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

भुसावळातही जल्लोष
भुसावळ- बाजारपेठ पोलिस ठाण्याबाहेर पदाधिकार्‍यांनी आतषबाजी केली. नगराध्यक्ष रमण भोळे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, प्रमोद सावकारे, युवराज लोणारी, माजी नगराध्यक्ष नीळकंठ भारंबे, भुसावळ विधानसभा क्षेत्राचे विस्तारक दिनेश नेमाडे, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस, पवन बुंदेले, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिकेत पाटील, नगरसेवक राजेंद्र नाटकर, नगरसेवक प्रमोद नेमाडे, सुहास फालक, किशोर पाटील, राजेंद्र आवटे, इजाजभाई खान, देवा वाणी दीपक धांडे, गोविंदा ढाके, विनीत हंबर्डीकर, गिरीश महाजन, राजू खरारे अनिरुद्ध ओक, ओसामा भाई रऊफ खान, निखील वायकोळे, पृथ्वीराज पाटील व इतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावललाही फटाक्यांची आतषबाजी
यावल- भारतीय जनता पार्टी रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रक्षा खडसे यांना जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी यावल शहराच्या वतीने यावल टी पॉईंट येथे भाजपा नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, गोपाळ सिंग यांच्या नारळ फोडून व फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी किशोर कुलकर्णी, योगेश भंगाळे, अतुल भालेराव, आकाश कोळी, व्यंकटेश बारी, स्नेहल फिरके, रज्जाक पटेल, शेखर बाविस्कर, विलास चौधरी व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सावद्यात फटाक्यांची आतिषबाजी
सावदा- दुर्गा माता मंदिरासमोर रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. गुरुवार, 21 रोजी संध्याकाळी खासदार रक्षा खडसे यांची भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवारी जाहीर झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. शहराध्यक्ष पराग पाटील यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्धार करण्यात आला. प्रसंगी अजय भारंबे, जयश्री नेहेते, पंकज येवले, जगदीश बढे, सतीश बेंडाळे, इलियास खान, कमलेश भारंबे, विक्की भंगाळे, संजय चौधरी, अतुल नेहते, जितेंद्र भारंबे, सचिन बर्‍हाटे, अतुल चौधरी, भरत भंगाळे, गजानन भार्गव, प्रतीक भारंबे, अरबाज, भैय्या नेमाडे, पराग पाटील, श्याम पाटील आदींची उपस्थिती होती.