खिर्डीतील किराणा दुकानदार घेताय ‘कोरोणा’बाबत काळजी !

0

खिर्डी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. रावेर तालुक्यातील खिर्डी बु॥ या छोट्याशा गावातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या किराणा दुकानाबाहेर सोशल डिस्टन्स पाळले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून येथील गावातील सध्या दुकानांमध्ये कोरोना व्हायरसबद्दल मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जात आहे. दुकानदारांनी एक ग्राहक माल घेवून बाहेर निघत नाही तो पर्यंत दुसर्‍या गिर्‍हाईकाला प्रवेश देणे टाळले आहे शिवाय दुकानाबाहेर थांबून असलेल्या ग्राहकांमध्ये किमान चार फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. सोशल डिस्टन्ससाठी मार्कींगही करण्यात आले आहे. यावेळी गावातील ‘निखील प्रोव्हीजन’ या दुकानाचे मालक अरुण चौधरी यांची प्रतिक्रिया घेतली असता ‘अशाप्रकारे जनजागृती केली व काळजी घेतली तर खरच कोरोणना व्हायरसला आपण आळा घालू शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी खिर्डी सर्कल मीना तडवी, तलाठी फिरोज खान व तत्पर फाऊंडेशनचे सदस्य आदी उपस्थित होते.