खून करणार्‍या पतीस न्यायालयीन कोठडी

0

जळगाव । शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात असलेल्या व्यकंटेश नगरात पत्नीच्या अनैतिक संबंधातून पतीने हातोडी तिच्या डोक्यात मारून तिची निर्घूण हत्या करून आरोपी पती रामानंद पोलीसात स्वतः हजर झाला होता. आज आरोपीस न्यायालयात हजर केले असत त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. हरिविठ्ठल नगर परिसरातील व्यकंटेश नगरात बाबुराव पानपाटील यांच्या भाड्याच्या घरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ज्ञानेश्‍वर पाटील हे पत्नी निलीमा व अडीच वर्षाची मुलगी कोमल यांच्यासोबत राहत होते. दरम्यान निलीमा ही कोणत्यातरी व्यक्तिसोबत फोनवर बोलत असायची यामुळे दोघांमध्ये वाद व्हायचे. शुक्रवारी मध्यरात्री घरी आल्यावर अज्ञात व्यक्ती घरात असल्याचे दिसून आल्याने संतापाच्या भरात त्यांने घरात असलेली हातोडी डोक्यावर मारून हत्या केली. त्यानंतर पळ जावून रामानंद पोलीसात शरण जावून गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या विरोधात रामानंद पोलीसात खूनचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज न्या.श्रीमती सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन पोलीस कोठडी देण्यात आली.